आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?Ahmednagar Murder Mystry

महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. (pune murder dead bodies of 7 members of one family found in bhima river )

पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक तपासात हे सर्व बुडून मृत्यू झाल्याचे दिसत असून पोलीस याचा तपास केला असता करणी प्रकरणी हत्या करण्यात आली आहे.

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

हत्या कशी करण्यात आली?

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोहन पवार त्यांच्या कुटूंबासह भीमा नदीत सापडले. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता. तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. त्याच्यातून हत्या झाली.

त्यामुळे धनंजय पवार यांच्या कुटूंबाने कट रचला. मोहन पवार यांच्या कुटूंबाला यवत परत आणलं. आणि त्यानंतर रात्री जवळपास साडेबारा एकवाजेच्या सुमारास यांना गळा दाबून मारण्यात आलं. त्यानंतर भीमा नदीत फेकण्यात आलं. इतकेच नव्हे तर त्यामध्ये तीन मुलं देखील आहेत. झोपलेल्या अवस्थेतच ७ जणांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा: Crime News : पुणे जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या

सर्वात आधी 18 जानेवारीला या नदीतून एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 19 जानेवारीला नदीत अजून एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20 जानेवारीला पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

Woman Suicide : पतीने मोबाईल ब्लॉक केल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

पोलीस या सगळ्याचा तपास करत असतानाच, 21 तारखेला पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. म्हणजेच 18 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये एकूण चार मृतदेह सापडले. यानंतर पोलिसांनी नदीच्या विविध भागात शोधमोहीम सुरू केली असता आणखी 3 मृतदेह सापडले. हे तिन्ही मृतदेह लहान मुलांचे होते.