निम्रितसाठी केलेल्या त्या कृतीनं शिवनं पुन्हा जिंकली भारतीयांची मनं! वीणाबरोबरही झाला होता असा प्रकार

मुंबई, 25 जानेवारी : मराठी बिग बॉसचा विनर शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये खेळतोय. शिवनं पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिवपेक्षा वेगळ्या पर्सनॅलिटीचे लोक असूनही त्यानं सर्वांना मॅनेज केलं आहे. सर्वांबरोबर तो मिळून मिसळून वागत असतो. खेळात तर तो दमदार आहेच मात्र घरात त्यानं माणूसकी कधीच सोडली नाही. समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं आणि विशेष म्हणजे मुलींना स्त्रीयांना रिपेक्ट देणं त्यांची काळजी, सुरक्षा घेणं ही गोष्ट शिवनं अगदी चोख पार पाडली आहे. आपला माणूस शिव ठाकरेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. निम्रित बरोबर झालेल्या एका प्रकारात शिवनं केलेल्या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिव ठाकरेनं बिग बॉसच्या घरात सर्वांना आपलं केलं आहे. निम्रित आणि एमसी स्टँडबरोबर शिवचं चांगलं पटतं. शिव आणि निम्रित एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. खेळातही दोघे दमदार स्पर्धक आहेत. नुकत्याच टेलिकास्ट झालेल्या एका एपिसोडमध्ये शिवनं केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत. शिवनं आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकलीत मात्र त्यानं आता त्यानं देशभरातील प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आहेत.

हेही वाचा - Shiv Thakare: 'आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या'; शिव ठाकरे म्हणाला, माझं आयुष्य...

मागच्या एपिसोडमध्ये निम्रित, एमसी स्टँड आणि सुंबूल गार्डन एरिआमधील डग हाऊसमध्ये बसले होते. यावेळी निम्रितनं शॉर्ट कपडे घातले होते. त्या कपड्यात ती अस्थाव्यस्त स्थितीत बसली होती. निम्रित ज्या ठिकाणी बसली होती तिच्या समोरच एक कॅमेरा होता. हे शिवच्या लक्षात आलं. त्यानं तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत तो कॅमेरा समोर पाठमोरा उभा राहिला. निम्रित गप्पांच्या नादात असल्यानं तिच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. शिवनं निम्रितला प्रोटेक्ट करण्यासाठी उशी तिच्यावर पायावर ठेवली. शिवनं केलेली कृती त्याच्यावर असलेले संस्कार दाखवून देत आहेत. याचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होतंय.

You target him as much as you can, still he would smile at you like nothing happened.. that's the kind of personality SHIV THAKARE possesses ❤️✨