Oscar Award 2023 Nomination: 'नाटू नाटू' गाण्याचा ऑस्करमध्ये डंका! अखेर मिळालं नॉमिनेशन

मुंबई, 24 जानेवारी: यंदाच्या 95व्या ऑस्कर अवॉर्ड 2023ची नामांकन यादी जाहीर झाली आहे. एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमातून नाटूनाटू या गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. नाटूनाटू हे गाणं बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीसाठी नॉमिनेट झालं आहे. नाटू नाटू या गाण्यानं लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकलं आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे. ट्विटवर #NaatuNaatuForOscars ट्रेंड होत आहे. सिनेमाचं आणि गाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

This year's Original Song nominees are music to our ears. #Oscars #Oscars95 pic.twitter.com/peKQmFD9Uh