Akshay Kumar: हेरा फेरी 3 वर प्रेक्षक नाराज; 'या' कारणामुळे अक्षय कुमारला पत्र लिहून व्यक्त केला संताप

मुंबई, 18 मार्च: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या एका चित्रपटाची तुफान चर्चा आहे तो म्हणजे 'हेरा फेरी 3'. अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाच्या हेरा फेरी चित्रपटाने एक काळ गाजवला. आजही हा चित्रपट अनेक लोकांचा आवडता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नुकतंच या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाच्या समोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. एका वेगळ्याच कारणामुळे हेरा फेरी 3 चर्चेत आला आहे.

'हेरा फेरी 3' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मध्यंतरी या चित्रपटातील अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे अक्षय कुमारच या चित्रपटात राजू च्या भूमिकेत दिसणार आहे. पण चित्रपटातील एका गोष्टीवर प्रेक्षक नाराज असून त्यांनी अक्षय कुमारलाच पत्र लिहिलं आहे.

संपूर्ण टीमसमोरच नूतनने 'या' सुपरस्टारला मारलेली कानाखाली, धक्कादायक होतं कारण

सध्या मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विरोध होताना दिसत आहे. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. फरहाद सामजी यांचे आधीचे चित्रपट आणि लेखन पाहता चाहत्यांना ते दिग्दर्शक म्हणून नको असल्याचं स्पष्ट होत आहे, यामुळेच फरहाद सामजी यांना ‘हेरा फेरी ३’मधून काढून टाकण्यात यावे याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

An open letter to @akshaykumar sir on the behalf of all Akkians to change the director of our iconic movie #HeraPheri3. We know just because of us you signed the movie agan so please reconsider the decision of the director.